नगरसेविका प्रियांका बारसे यांचा उपक्रम
हे देखील वाचा
भोसरी : शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने नुकताच प्रियांका बारसे यांनी गवळीनगर, भोसरी येथे भाजपाच्यावतीने महिला मेळावा घेतला. यावेळी स्त्री शक्तीची जाणीव करून देणार्या कार्यक्रमात नगरसेविका प्रियांका बारसे, पिंपरी-चिंचवड शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा शैलजा मोळक, भाजपा महिला प्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सचिव ज्योती जाधव यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणार्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आदर्श माता गीता पवार, सामाजिक कार्यकर्त्या पूनम ओव्हाळ, महिला कीर्तनकार मीरा कोठमारे, स्कूल बस चालक जयश्री अब्राहम, राज्यस्तरीय कराटे खेळाडू कृतिका पिल्ले, मेकॅनिकल इंजिनिअर पुजा आखडे, डॉक्टर सुकन्या कापसे आदी विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी सन्मान कर्यात आला. प्रभागाध्यक्षा अनुराधा दौंड यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना आरोटे यांनी केले.