जळगाव । नवरात्र उत्सवानिमित्त येथील एम.एम. महाविद्यालयातील वरिष्ठ महाविद्याललयातील विद्यार्थीनींना महाविद्यालयाच्या वतीने मुलींना सक्षमी करण्याची प्रेरणाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपप्राचार्या मंगला शिंदे यांनी अनेक विषयासह उदाहरणे देवून मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, समाजातील दृष्ट व राक्षसी प्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी दुर्गा मातेने वेगवेगळी रूपे घेतली आणि राक्षसी शक्ती नष्ट केल्या. त्याचे स्मरण म्हणून भरतीय संस्कृतीत नवरात्र उत्सवाचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थींनींनी आपल्या आत्मरक्षणासाठी सामूहिक शपथ घेतली. या शपथविधीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील, उपप्राचार्य मंगला शिंदे, डॉ.वले, डॉ.जे.व्ही.पाटील, प्रा.पुरी, इंगळे, वळवी, तडवी, शबाना मॅडम, गवीत, संदीप पवार, संतोष महाजन, विजय पाटील, जावेद देशमुख, सचिन परदेशी यांनी परीश्रम घेतले.
महिलांनी आत्मरक्षणासाठी नेहमी तत्पर राहण्याचे आवाहन
नवरात्रीचा जागर पुरूषांपेक्षा महिलांसाठी महत्वपुर्ण समजला जातो. दुर्गा प्रमाणे प्रत्येक स्त्रीमध्ये अनिष्ठ, राक्षसी प्रवृत्ती नष्ट करण्याची एक सुप्त शक्ती लपलेली असते. ती शक्ती जागृत व्हावी. महिली महिषासूर मर्दीनी प्रमाणे आपल्या समोर आलेल्या राक्षसी प्रवृत्तींचा नाश करावा. अशी अपेक्षा समोर ठेवूनच कदाचित आपल्यात संस्कृतीवा नवरात्र पाळली जाते. नऊ रात्रींतून दुर्गामातेच्या कार्याचा उदोउदो केला जातो. तिच्या कर्तृत्वाची माहती गायली जाते. दुर्गापाठ वाचले जातात आणि अखिल भारतीय महिलांसमोर कृर्तृत्वाचा आदर्श ठेवला जातो हे या मागचे कारण आहे. आजसुद्धा समाजात स्त्रियांच्या भवताली अनेक राक्षसी व दृष्ट प्रवृत्ती आहेत. स्त्रीयांवर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय व अत्याचार होत असतांना दिसतात. हे अन्याय व अत्याचा समाजप्रबोधन व कायद्याद्वारे नष्ट होतील असे वाटत होते. परंतू दिवसेंदिवस स्त्री अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. म्हणून स्त्रियांनीच या विरूद्ध आपल्यातील सुप्त शक्ती जागृत करून अन्यायाचा विमोड केला पाहिजे. स्वतःमध्ये एक मानसिक व शारिरीक शक्ती जतन करून अन्यायाचा प्रतिकार केला तर खर्या अर्थाने नवरात्रीचा उद्देश सफल होणार असल्याचे प्रतिपादन उपप्राचार्य मंगला शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थीनींना केले.