नवरात्र उत्सवात लोडशेडींग करू नये

0

धुळे- धुळे शहरातील खान्देश कूलस्वामीनी आाई एकविरा देवींच प्राचिन मंदिर आहे. नवरात्र उत्सव याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सव सुरु होण्यापूर्वीच देवपूर भागातील राज्य विद्युत महामंडळाच्या शाखेने लोडशेडींग सुरु केली आहे. ही लोडशेडींग बंद करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन पंचायत समिती सभापती कैलास चौधरी यांनी दिले.

नवरात्र उत्सवात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश येथून भाविक आई एकविरा देवींचे दर्शन घेण्यासाठी धुळ्यातील मंदिरात दाखल होतात. सकाळी पाच वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत देवीच्या मंदिरात भाविक व भक्तांची मोठी गर्दी होत असते. नवरात्र उत्सव काळात लोडशेंडीग केल्यास आलेल्या भक्तांसाठी स्वयंपाक, पिण्याचे पाण्याची सोय होत नाही. त्यामुळे भाविकांना अनेक अडचनीचा सामना करावा लागतो. अंधाराचा फायदा घेवून चोरींच्या घटना घडतात. त्यामुळे नवरात्र उत्सवात 15 दिवस कोणत्याही प्रकारांची लोडशेंडीग करु नये निवेदन विद्युत महामंडळाला देण्यात आले आहे. यावेळी जगन महाजन, भुषण गुरव, मनिष चौधरी, धनजंय गुरव, अशोक मराठे, रविंद्र वाघ यांनी अतिरिक्त अभियंता किशोर शिंदे यांना निवेदन दिले.