पुणे । पुणे नवरात्री महोत्सव समितीतर्फे येत्या 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य यांचा मनोहारी मिलाफ असणार्या 23व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर महोत्सवात समितीतर्फे देण्यात येमारा श्री महालक्ष्मी कला-संस्कृती जीवनगौरव पुरस्कार अभिनेते सुबोध भावे, क्रिकेटपट्टू मोना मेश्राम, विविक वेलणकर, हभप महंत, पुरुषोत्तम पाटील बरखा जळगावकर यांना दिला जाणार आहे. तसेच महोत्सवात विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे अशी माहिती माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि.21) सायंकाळी साडेपाच वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. उद्धाटनानंतर अभिनेत्री किशोरी शहाणे, मानसी नाईक, श्वेता शिंदे, भार्गवी चिरमुले, अभिज्ञा भावे आदी कलाकार कलाविष्कार सादर करणार आहेत.
भैरवनाथ तरुण मंडळ
एरंडवणा येथील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने यंदाही कला- नाट्य-संगीत यांनी नटलेला शारदीय नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. याचा प्रारंभ घटस्थापनेनिमित्त ढोलताशा, इकबाल दरबार बॅन्ड व इचलकरंजीच्या वस्ताद गुंडू दरीदे यांच्या राणाप्रताप व्यायाम मंडळाच्या दानपट्यासह महिलांच्या उपस्थितीत सायं. 6 वा. देवीची मिरवणूक डेक्कन जिमखाना ते महादेव मंदिर चौक काढण्यात येणार आहे. रात्री 10 वा. शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते देवीची प्रतिष्ठापना होणार असल्याची माहिती अध्यक्ष राम बोरकर यांनी दिली.