नवरीची घोड्यावरून मिरवणूक

0

यवत । लग्न म्हटले की, डीजेच्या तालावर वाजतगाजत घोड्यावरून निघालेली नवरदेवाची मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेते. ही प्रथा सर्वत्र रूढ आहे. मिरवणुकीच्यावेळी नवरदेवाला बसायला घोडा मिळाला नाही तर, रुसवे, फुगवे पाहावयास मिळतात. जणू वरानेच घोड्यावर बसण्याचा मक्ताच घेतला आहे. ही मक्तेदारी मोडीत काढत चक्क नवरीची मिरवणूक घोड्यावर काढल्याचे दौंडमध्ये पहावयास मिळाले.

दौंड तालुका भाजपाच्या नवनिर्वाचित महिला उपाध्यक्षा मंगलताई खेडेकर यांनी आपली मुलगी नववधू प्रियांका हिची घोड्यावरून वाहतगाजत मिरवणूक काढली. मुला समान मुलगीही असते हा भेदभाव न करता या कृतीतून मंगलताई खेडेकर यांनी समाजाला चपराक दिली. प्रियंकाचा विवाह 26 नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला. तत्पूर्वी सकाळी वधू प्रियंकाची घोड्यावरून यवत गावातून डीजे व सनई चौघड्यांच्या वाद्यात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली होती.