चाळीसगाव – नववर्षाच्या पूर्व संध्येला दारू पिवून वाहन चालवणार्या दोघां तळीरामांसह वाहतुकीचे नियम मोडणार्या 49 जणांवर चाळीसगाव शहर व वाहतुक शाखेच्या पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. नववर्षानिमित्त चाळीसगाव पोलीसांनी शहरभरात चोख बंदोबस्त ठेवला होता. 31 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण तयारीत असतो प्रत्येक जण आपापल्या परीने नववर्षाचे स्वागत केले जाते तर तळीराम मात्र या मुहुर्तावर दारु पिणे आपले कर्तव्य समजुन मोठ्या प्रमाणावर दारु पिवुन धिंगाणा घालुन कायदा सुव्यवस्था मोडतात याचा ताण जनतेसह पोलीसांवर पडतो या पार्श्वभूमवर चाळीसगाव शहर व वाहतुक पोलीसांनी 31 रोजी व 1 जानेवारी रोजी रात्री करडी नजर ठेवली होती. अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बछाव, डीवायएसपी नजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सपोनि आशिष रोही, सुरेश शिरसाठ, पोउनि राजेश घोळवे, युवराज रबडे, विजय साठे यांच्यासह चाळीसगाव शहर पोलीस व शहर वाहतुक पोलीसांनी शहर भरात गस्त लावुन घाटरोड पोलीस चौकी व सिग्नल पॉईंट येथे दारु पीऊन वाहन चालवणार्या दोघा तळीरामांवर कारवाई केली तर विना नंबर, शो नंबर, विनाकागदपत्र तसेच वाहतुकीचे नियम मोडणार्या 49 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.