वाकड – दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने नवीन घरात राहायला जाताच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रहाटणी मधील समता कॉलनी येथे गुरुवारी (दि. 12) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सारिका गणेश पाटील (वय 20, रा. समता कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिकाचे गणेश सोबत मागील दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. सारिका, पती गणेश आणि सासू हे तिघे रहाटणी मधील समता कॉलनी येथे घेतलेल्या नवीन घरात दोन दिवसांपूर्वी राहायला आले होते. सर्व काही सुरळीत सुरु असताना शुक्रवारी अचानक सारिकाने घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.