पुणे । पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री 11 च्या सुमारास कात्रजमधील संतोषनगरमध्ये घडली. ऋतुजा दीपक जाधव (वय 18) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती दीपक शिवाजी जाधव याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक आणि ऋतुजा यांचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नाच्या 15 दिवसानंतरच दिपकने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. नागपंचमीनिमित्त मुलीला घरी पाठवण्यासाठी ऋतुजाच्या माहेरच्या मंडळींनी दीपकला फोन केला असता त्याने उचलला नाही. त्यामुळे ते त्यांच्या घरी गेले असता घराला कुलूप होते. त्यावेळी तो हडपसरमध्ये असल्याचे समजले. चौकशी दरम्यान त्याने पत्नीला मारल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांनी त्यांच्या घरी धाव घेतली. दरम्यान दिपक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.