नववीच्या भूगोलाच्या पुस्तकात चुकीचा नकाशा

0

पुणे । बालभारतीने नववीचा नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यात भूगोलाच्या पुस्तकातील देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा चुकविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात गुजरात राज्याचा बहुतांश भूभाग हा पाकिस्तानामध्ये दाखवत बालभारतीने कहर केला आहे.

बालभारतीने नववीच्या पाठ्यपुस्तकात भूगोलाच्या पुस्तकातील नकाशात भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा चुकविल्या आहेत. बालभारतीने गेल्यावर्षी दहावीच्या पुस्तकात नकाशे चुकीचे छापले होते. त्याचाच कित्ता गिरवत यावर्षीही बालभारतीच्या नववीच्या भूगोलाच्या पुस्तकात चुकीचे नकाशे छापण्यात आले आहेत. या वर्षीच्या चुकीच्या नकाशांची सर्व्हे ऑफ इंडियाने गंभीर दखल घेतली आहे. नववीच्या पुस्तकातील हे नकाशे ताबडतोब बदलण्याची नोटीस राज्य शिक्षण मंडळाला पाठविण्यात आली आहे.

दरम्यान, सर्वे ऑफ इंडियाचे आम्हाला नकाशे बदलण्याबाबतचे पत्र आले आहे. मात्र, पाठ्यपुस्तकांची छपाई बालभारती करत असल्याने ती बालभारतीची जबाबदारी असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.