जळगाव। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत यंदापासून नववीच्या विद्यार्थ्यांसाठीही नैदानिक चाचणी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्याच्या क्षमतांचे मुल्यमापन करण्यासाठी ही चाचणी 18 आणि 19 ऑगस्ट रोजी होणार आहे, प्रथम भाषा विषय आणि गणितासाठी घेण्यात येणार्या या चाचण्या यंदापासून इंग्रजी आणि विज्ञानासाठीही होत आहेत. या चाचण्यांच्या आधारे नववीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष वर्ग घेण्यात येणार आहेत.
अशी होईल चाचणी…
विद्यार्थ्यांनी आतापर्यंत घेतलेल्या शिक्षणासाठी 30 गुण आणि नववीच्या पाठ्यक्रमावर 20 गुण अशा 50 गुणांवर ही नैदानिक चाचणी होणार आहे. अधिक माहिती www.mscret.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दुसरी ते नववीसाठी पायाभूत चाचणी 18 आणि 19 ऑगस्टला होणार आहे. प्रथम भाषा, इंग्रजी विषयाची चाचणी 18 ऑगस्टला 11 ते या वेळेत होईल. गणित आणि विज्ञान विषयाची चाचणी 19 ऑगस्टला 11 ते या वेळेत होणार आहे. तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 21 ते 24 ऑगस्टला शाळांमध्ये घेण्यात येईल अशीही माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली.