पिंपरी : महापालिकेच्या 18 माध्यमिक शाळेतील मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या नववीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या क्रमिक पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे. यांचा खर्च तब्बल 16 लाख 17 हजार 479 रुपये इतका आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारतीच्या वतीने एकूण 28 हजार 63 पुस्तके 30 जूनला खरेदी करण्यात आली.
त्याची किंमत 18 लाख 24 हजार 937 इतकी आहे. तसेच नववीच्या एकूण एक हजार 465 पुस्तके 25 जुलैला खरेदी करण्यात आली. त्याची किंमत 77 हजार 980 इतकी आहे. या पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी देय रक्कम अनुक्रमे 15 लाख 51 हजार 196 आणि 66 हजार 283 अशी एकूण 16 लाख 17 हजार 479 रूपये आहे. सदर रक्कम बालभारतीला अदा करण्यात आली आहे. त्यास कार्योत्तर मान्यता देण्याचा विषय बुधवारी (दि.22) होणा-या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.