मुंबई : ‘जीनियस’ चित्रपटाच्या एका सीनची पाकिस्तानात प्रचंड चर्चा होत आहे. नवाजुद्दीन सिद्धीकी आणि मिथुन चक्रवर्ती या चित्रपटात काम करत आहेत. यांच्या एका सीनमध्ये लाहोरच्या आरफा टेक्नोलॉजी पार्कला गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे मुख्यालय दाखवण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे मुख्यालय इस्लामाबादमध्ये आहे. ही चूक पाकिस्तानच्या आयटी विशेषज्ज्ञ उमर सैफ यांनी ट्विटवर सांगितली. त्यांनी चित्रपटामधील सीनचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करुन बॉलिवूडला उत्तम लेखकाची आवश्यकता असल्याचे सांगितले. यानंतर पाकिस्तान यूजर्सनी चित्रपटाला ट्रोल केले.