इस्लामाबाद । जागतिक पातळीवर गाजलेल्या, पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधातील पनामा पेपर लीक प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गुुरुवारी निकाल सुनावला आहे. येथील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
यावेळी सर्व विभागांचा समावेश असलेल्या संयुक्त तपास पथकाला या प्रकरणाची 60 दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. खंडपीठाच्या दोन न्यायाधीशांनी नवाझ शरिफांना पायउतार करावे म्हटले आहे तर तीन न्यायाधीशांनी पुढील चौकशी गरजेचा असल्याचे मत नोंदवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. कोर्टाने शरीफ यांच्यासह त्यांच्या मुलांना संयुक्त चौकशी समितीसमोर हजर राहण्याचा आदेश दिले आहेत. पनामा पेपर्स लीक प्रकरणामुळे नवाझ शरीफ यांच्या खुर्चीवर गदा येण्याची शक्यता आहे. नवाझ शरीफ हे दोषी आढळल्यास त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.