नवापूर। शहरातील देवळफळी भागत राहणारे भोई समाजातील आईसह दोन मुलांनी 12वींची एकत्र परिक्षा देऊन शिक्षणाचा वेगळा संदेश दिला. सविता महेंद्र मोरे (वय 37) यांना 65 टक्के मिळाले तर व मोठा मुलगा हेमंत महेंद्र मोरे,(वय 20) 64 टक्के लहान मुलगा प्रफुल्ल महेंद्र मोरे (वय18) 62 टक्के मिळून तिन्ही मायलेकी उत्तीर्ण झाले आहेत. यांनी नुकताच बारावीची परिक्षा श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथील परिक्षा केंद्रावर दिली. दहावी शिकलेली आईला मुलांचा अभ्यास घेता-घेता शिक्षणाची गोडी निर्माण झाली. तिने मुलांना सोबत परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. 17 नंबरचा फार्म भरून आईने मुलांना सोबत परिक्षा दिली. सोबत अभ्यास करणे, परिक्षेत सोबत जाणे, आलेल्या अडचणी एकमेकांना विचारणे असा चर्चात्मक अभ्यास करून बारावी परिक्षेत यश संपादन केले.
कसा आला योग
सविता मोरे यांनी दहावी नंतर नर्सिंगच्या कोर्स केला. त्यानंतर काही कारणास्तव बारावी परिक्षा देता आली नाही. 17 वर्षांनंतर यंदा 17 फार्म भरून कला शाखेत बारावीची परिक्षा दिली आणि यश संपादन केले. मोठा मुलगा हेमंत मोरे यांनी दहावी नंतर आयटीआय कोर्स केला. त्यानंतर कंपनीत नोकरी लागल्याने खंड पडला आई आणि मुलाने विचार केला सोबत परिक्षा देण्याचा. लहान मुलगा प्रफुल्ल मोरे नियमित बारावी परिक्षा देत असल्याने तिघांचा एकत्र परिक्षा देण्याचा योग आला.
शिक्षणाची जिद्द असावी
घरदार सांभाळून मुलां मध्ये आई अव्वल राहिली दोन्ही मुलांपेक्षा पतीला जास्त टक्के मिळाले माणसात केवळ शिक्षणाची जिद्द असवी लागते.त्यातून सर्व काही साध्य होते.परिक्षा दरम्यान उर्वरित घरातील काम मी स्वत करायचो माझी पती दोन्ही मुले परीक्षेचा अभ्यास करताना त्यांना कोणात्याही त्रास होऊ दिला नाही.
महेंद्र मोरे, कुटुंब प्रमुख, नवापूर
बहिस्थ सुविधेचे महत्व
शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी 17 नंबरचा फार्म भरून परिक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने अनेकांना त्याचा फायदा झाला आहे. उच्च शिक्षित झाले, नोकरी लागली, लग्न जमले असे अनेक फायदे झाले आहेत. शिक्षण विभागाची ही योजना समाजात लाभदायक ठरत आहे. सध्या सविता मोरे शहादा तालुक्यातील कुडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून कार्यरत आहे. मोठा मुलगा हेमंत महेंद्र मोरे पुण्यात कंपनीत नोकरी करतो. लहान मुलगा प्रफुल्ल महेंद्र मोरे नाशिकला कंपनीत काम करतो.