नवापुरातून 250 भाविक सप्तश्रृंगी गडाकडे रवाना

0

नवापूर । शहरातुन काल रात्री 250 भाविक सप्तश्रृंगी गडाकडे पदयात्रेसाठी निघाले. ही पदयात्रा सर्वात मोठी पदयात्रा ठरली आहे. या पायी गडावर जाणारे भाविकांनी सुरुवात शास्त्री नगर भागातील सप्तश्रृंगी मातेचा मंदीरा पासुन केली. यावेळी गडावर दरवर्षी जाणारे दर्शन पाटील, रवि सोनवणे, दर्पन पाटील यांचा सत्कार जि.प. अध्यक्ष रजनीताई नाईक व माजी नगराध्यक्ष दामु बिराडे यांनी भगवी शाल देऊन केला.

महिलांचा लक्षणीय सहभाग
यावेळी समाजीक कार्यक्रते हेमंत जाधव,दैनीक पत्रकीर संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील, सचीव- महेंद्र जाधव,रज्जु अग्रवाल,दगुबाई सोनवणे,भुषण पाटील, जिग्नेश पाटील, जितेंद्र अहिरे,मयुर सिंधी,संदिप चौधरी,राहुल मराठे, अनंत पाटील, बालम लोहार, शैलेष सैन, अ‍ॅड. जयेश चांदेकर, आदी उपस्थित होते. याप्रसंगी सप्तश्रृंगी मातेची आरती रजनीताई नाईक यांनी केली व सर्व पायी गडावर जाणार्‍या सर्व भावीकांना शुभेच्छा दिल्या. दरवर्षी पायी गडावर जाण्यार्‍या भावीकांची संख्या वाढत असुन गटा गटाने युवक गडावर जात आहे. यात महिलांची संख्याही वाढत आहे. गडावर जाणारा हा दुसरा जथ्था असुन ढोल तााशांचा व डिजेचा गजरात भावीक मातेचा दर्शनासाठी जात असतात.