नवापुरात आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

0

नवापूर । नवापूर तालुका आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक प्रांत अधिकारी निमा अरोरा यांचा अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्ही.व्ही. बोरसे, तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, नायब तहसीलदार बहादुसिंग पावरा, प्रांत कार्यालयाचे आर. पी. बच्छाव उपस्थित होते. यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक बैठकीत उपस्थित होते. प्रांत अधिकारी निमा अरोरा यांनी पांझरा तलाव लिकेज आहे की नाही? याची पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

कर्मचार्‍यांनी मोबाईल बंद न ठेवण्याचे आदेश
आपत्ती काळात तलाठी ग्रामसेवक यांची जबाबदारी महत्वाची असल्याचे सांगत सावध राहण्याचे आदेश दिले. या बैठकीत नगरपालिकेचे एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे प्रांतअधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी वाळेकर म्हणाले की, पावसाच्या काळात पिण्याचा पाण्याची काळजी घ्यावी. तहसीलदार प्रमोद वसावे यांनी येण्याजाण्याचा रस्त्यावरील पुलावर काळजी घेण्याचे सांगत याकाळात नवापुर तालुक्यातील कर्मचार्‍यांनी मोबाईल बंद न ठेवता सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच या काळात कुठल्याही कर्मचार्‍याने हलगर्जीपणा केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला.