नवापूर । नवापुर शहरात आज रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवानी सामुहीक नमाज पठण केले. यावेळी लहान बालगोपलसह पुरुषांनी नविन कपडे परीधान केले होते. यावेळी नवापुर पोलिस स्टेशनतर्फे ईदगाह मशिदजवळ ईदचा शुभेच्छांचे बँनर लावण्यात आले होते.
माणिकराव गावितांनी दिल्या शुभेच्छा
यावेळी माजी केंद्रीय गृहराज्य मंञी माणिकराव गावीत,माजी.जि.प अध्यक्ष भरत गावीत,आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, शेतकरी संघाचे अध्यक्ष अजित नाईक,विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक चंद्रकांत नगराळे, अजय पाटील,शिरीष प्रजापत,आर. सी गावीत,राष्ट्रवादी कॉग्रस पक्षाचे अमृत लोहार,माजी नगरसेवक विनय गावीत,रमला राणा,पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत,सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा,शरद पाटील,जैयनु गावीत आदीनी इदगाह मशिदी येथे जाऊन मुस्लिम बांधवांना ईदचा शुभेच्छा दिल्या.शहरात एकमेकांना ईदचा शुभेच्छा देण्यात आल्या.तसेत नारायण पुर रोड वर भाजपा अल्पसंख्याक सेल तर्फ मंडप उभारुन नास्ता व घीर खुरमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील नागरीकांनी येऊन मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.शहरात जागो जागो शुभेच्छाचे बँनर लावण्यात आले होते.