नवापुरात ईदनिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन

0

नवापूर । नवापुर पोलीस स्टेशनतर्फे ईदनिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी.जि.प अध्यक्ष भरत गावीत,उद्योगपती विपिन चोखावाला, आरीफ पालावाला, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, शिरीष प्रजापत,अजय पाटील, माजी तहसिलदार प्रमोद वसावे, न.पा मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे, न.पा कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे, पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम,नगराध्यक्ष दामु बिराडे, हेमंत पाटील, उपाध्यक्ष निलेश पाटील, सचिव महेद्र जाधव,मंगेश वाणी, प्रकाश खैरनार,भाजपचे अनिल वसावे, शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेश वडनेरे, गुलाम व्होरा,याकुब टिमोल, सोहल जनतावाला,मौलाना रऊफ मनियार, युसुफ कायदावाला, इम्तियाज वालोडीया,कलिम पठाण, पमा सैय्यद, इमरान पटवा,सुलतान पटवा आदी उपस्थित होते.

मागील कटु आठवनी विसरावे
सुरुवातीला प्रास्ताविकात नवापुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी नवापुर शहर हे शांत शहर असुन धार्मिक परंपरा जपत असताना सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी नवापुरकरांनी चांगले योगदान दिले आहे.असाच भाईचारा सर्वानी कायम ठेवावा असे सांगितले.माजी.जि.प अध्यक्ष भरत गावीत म्हणाले की जातीय सलोखा कायम ठेऊन एकमेकांचे सण उत्सव सौहार्दपुर्ण वातावरणात साजरे करावे.मागील कटु आठवनी विसरुन कायम एकोपा ठेवावा.