नवापुरात एकदिवसीय हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिम शुभारंभ

0

नवापूर। पंचायत समिती तालुका आरोग्य कार्यालयामार्फत हत्तीरोग एकदिवसीय सामूदायिक औषधोपचार मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिरीष नाईक, पंचायत समिती सभापती सविता गावीत, उपसभापती दिलीप गावित यांना हत्तीरोग दुरीकरणासाठी गोळ्या खावू घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहा.संचालक पुणे डॉ.बाळकृष्ण कांबळे, दिल्ली येथील प्रियंकता नायक, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.ढोले तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हरिषचंद्र कोकणी हे उपस्थित होते.

घरोघरी जावून गोळ्यांचे होणार वाटप
नवापूर तालुक्यात 26 जुलै ते 30 जुलै 2017 घरोघरी जावून गोळ्या खावू घालण्याचा कार्यक्रम केला जाणार आहे. याबाबत त्यांनी जनतेस मार्गदर्शन केले. वचूरेरीया बॅक्रोफ्टी नावाच्या परजीवी जंतूमुळे हत्तीरोग हा आजार होतो व त्याचा प्रसार क्युलेक्स क्वीक्वीफेशिटस या डासामार्फत होतो. हा डास दुषित व्यक्तीस डास चावला असता त्याच्या शरीरातील मायक्रोफायलेरिया रक्ताबरोबर डासांच्या शरीरात प्रवेश करतात व तो डास निरोगी माणसास चावल्यास त्याच्या शरीरात प्रवेश करतात व अशाप्रकारे रोगाचा प्रसार होतो, असे म्हणाले. हत्तीरोग दूरिकरण करतांना डासांचे पैदास होणारी स्थळे उदा. उघडी गटारे, डबकी, शौचालयाच्या सेप्टीक टँक आणि साचलेल्या पाण्याची इतर ठिकाणे अशा स्थळांचा नाश केल्यास कुलेक्स डास नियंत्रणासाठी त्याचा दूरगामी फार मोठा फायदा होतो.

यांची होती उपस्थिती
डास नियंत्रणातील महत्वपूर्ण पण तात्पुरती उपाययोजना म्हणजे डासांच्या पैदासस्थळी अळीनाशक तेलाची किटकनाशकाची फवारणी करणे या प्रकारे जनतेने आपल्या परिसरात स्वच्छता ठेवल्यास ते स्वतः तसेच आपल्या परिवारास व परिसरातील जनतेस हत्तीरोग मुक्त जीवन जगू शकतात, असे जनतेने हत्ती रोग मुक्त नवापूर तालुका होण्यासाठी नवापूर तालुक्यातील जनतेस आव्हान केले. कार्यक्रमाच सूत्रसंचालन विस्तार अधिकारी आर.डी.गावीत यांनी केले तर आभार दिनेश वानखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी.पी.बोरसे, एन.के.श्रीरंगे, दिपक परदेशी, सचिन लोहारे, दिपमाला दर्जी, शितल भावसार, लता जगताप, अनेश वसावे यांनी परिश्रम घेतले.