नवापूर। शहरातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात सालाबादाप्रमाणे श्री गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. श्री गुरूपौर्णिमे निमित्त श्री स्वामी समर्थ केंद्र सजविण्यात आले होते.विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सात दिवस सेवेकरी बंधु भगिनीनी श्री गुरूचरिञ पारायणाचे वाचन केले.एकुण 70 स्ञी पुरूषांनी पारायण वाचन करून सहभाग घेतला. सकाळी भुपाळी आरती, स्वामी समर्थ महाराज यांच्या मुर्तीवर सामुहिक षोडशोपचार पुजन, सत्यनारायण पूजा, महानैवध आरती व सायंकाळी सहा चा नैवध आरती करून तीर्थ प्रसाद वाटप करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमे समोर सेवेकरी मुलींना आकर्षक रांगोळी काढली होती. ती रांगोळी सर्वांचे लक्ष केंद्रित करून गेली. याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी भेट देऊन दर्शन घेतले. तसेच कोमल शर्मा यांनी सुमधूर भक्तीगीते, भजने गाऊन उपस्थितांची दाद मिळवली. प्रसंगी सेवेकरी बंधु भगिनीना गुरूपौर्णिमेबदल मार्गदर्शन करण्यात आले. सायंकाळी दर्शनासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तर बालसंस्कार केद्रातील प्रतिनिधीनी तालुक्यातील व शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थाना गुरूपौर्णिमे बदल माहिती देऊन मार्गदर्शन केले. शहरातील विविध परिसरात गुरूपौर्णिमे निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिरामध्ये विविध पुजा व होमहवन करण्यात येऊन विधिवत कार्यक्रम संपन्न झाले.