नवापुर। न वापुर नगरपालिकेत रस्ते विकास निधीतुन शहरातील नावाजलेल्या प्रतिष्ठीत रहीवाशी राहत असलेल्या सराफ गल्लीत नऊ लाख रुपये खर्चातुन उभारलेल्या डांबरीकरण रस्त्याची एक महिन्यातच दयनिय अवस्था झाली म्हणुन रहिवांशानी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचाकडे तक्रार केली होती, त्यांनी गंभीरपणे लक्ष देऊन या डांबरीकरण रस्त्याची गुणवता नियंत्रण विभागाकडून तपासणी करण्याचे विभागाकडुन करण्यासह संबधित ठेकेदारास कामाचे बील देऊ नये, असा आदेश दिला होता. त्यामुळे नगर पालिका प्रशासन खळबडून जागे झाले. डांबरी रस्ता परत चांगला करण्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितल्यावर अखेर आज नवापुर शहरातील सराफ गल्लीचा नागरीकांनी नवापुर नगरपालिकेत जाऊन नवीन डांबरीकरण रस्त्याची समस्या मांडली व निकुष्ट झालेल्या डांबरीकरण कामाबदल तीव्र संताप नगराध्यक्ष रेणुका गावीत यांच्यासमोर मांडून डांबरीकरण कामात कालाबाजार झाल्याची शंका व्यक्त केली.
गुणवत्तेबाबत जिल्हाधिकार्यांची नाराजी
यावेळी अभियंता माळी यांनी सांगितले की आम्ही आता लेखी देऊ शकत नाही. कारण आमचे प्रभारी मुख्यधिकारी शांताराम गोसावी हे बुधवारी येणार असुन त्यावेळी आम्ही लेखी आश्वासन देऊ असे सांगितले. लेखी आश्वासन देऊन देखील डांबरीकरण रस्ता चांगला करुन काम पुर्ण झाले नाही तर सराफ गल्लीतील रहीवाशी हे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सराफ गल्ली रहीवांशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील विविध भागात गेल्या दोन तीन वर्षात उभारण्यात आलेल्या रस्ते कामाचा गुणवत्तेबाबत यापुर्वी जिल्हाधिकार्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती.
नागरीकांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा
सराफगल्लीत आजूबाजुला सिमेंट ब्लॉक बसविण्याचे निवेदनात असतांना ते बसविण्यात आले नसल्याचे रहीवाशांनी यावेळी सांगितले. रस्ता फक्त 20 एमएमचा बनवला आहे. अंत्यत धातुर मातुर काम करुन मोठी मलाई खाण्याचा डाव रहीवांशांनी जागुरकतेने उधळून लावला आहेे. रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. पाऊसाला सुरुवात झाल्यावर पुढे या रस्त्याचे काय हाल होतील व रहिवाशांना काय त्रास होणार आहे, याची कल्पना न केलेली बरी. त्यावेळी या रस्त्याचे वेगळेच चित्र राहणार आहे. आज नवापुर नगरपालिकेत जाऊन रहिवाशांनी अभियंता सुधिर माळी यांना धारेवर धरले व डांबरीकरण रस्ता परत चांगला करण्याची मागणी करुन त्यांचा कडुन लेखी आश्वसानाची मागणी केली.
ठेकेदारांना कामाचे बील न आदा करण्याचे आदेश
डांबरीकरण रस्त्याची समस्या मांडली व निकुष्ट झालेल्या डांबरीकरण कामाबदल तीव्र संताप नगराध्यक्ष रेणुका गावीत यांच्यासमोर मांडून डांबरीकरण कामात कालाबाजार झाल्याची शंका व्यक्त केली. रस्ताचे काम बोगस झाल्याचे सांगण्यात आले. 300 मीटर लांबीचा सदर रस्ताची उभारणी नऊ लाख रुपये खर्चुन करण्यात आली आहे. मात्र रस्ते कामाचा निवेदना प्रमाणे काम झालेच नाही. कमी जाडीचे डांबरीकरण ठिकठिकाणी उखडल्याने खड्डे पडुन कपची डांबरसह बाहेर निघत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी सांगितले की सराफ गल्लीतील निकुष्ट डांबरीकरण रस्ता करणार्या ठेकदाराला व त्यामागील झारीतील शुक्राचार्याना काळ्या यादीत टाका, अशी मागणी केली मागील दोन महिन्यापुर्वी सराफ गल्लीत नगरपालिकेने नविन डांबरीकरण रस्ता बनविला आहे. या रस्त्यावर आतापासून खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे व या रस्त्याची उंचीही बरोबर नसून रस्त्याचे डांबर हे पाण्यासारखे वितळत आहे.