नवापुरात पावसाची संततधार

0

नवापूर। शहर व परिसरात गेल्या सोमवार पाऊस पावसाची संततधार सुरू असुन मागील आठवड्यापासुन सुरु दर्शन झालेले नाही. दोन दिवसांपासून राञभर पाऊस धो धो बरसाला, त्यामुळे रंगावली नदी दुथडी भरून वाहू लागले आहेत. जुन महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. माञ जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला असुन पेरणी करून पावसाच्या दिलेल्या साथी मुळे पीके चांगली आहेत त्यांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाचा एकसारख्या रिपरिपने नदी नाल्याना पुर आल्याची स्थिती आहे शहर व परिसरात भिजपाऊस सुरू आहे त्यामुळे भात रोपणी करण्यास शेतकर्‍यांकडून सुरू झाली आहे.

पुर्वीचे दिवस येत आहे
गुजरात-महाराष्ट्र सीमेवर वसलेले नवापूर शहर पुर्वी जंगलाने वेढलेले होते त्याकाळी आताचा बसस्थानक भागाकडे लोक यायला घाबरायचे पावसाळ्यात एक महिना संततधार पाऊस असायचा सुर्य दर्शन व्हायचे नाही रंगावली नदीला दोन तीन वेळा पुर यायचे तसेच जवळपास आहवा डांगचे भव्य जंगल आहे त्यामुळे रंगावली नदीला पुरस्थिती दरवर्षी असायची पण कालांतराने झाड्याची कत्तल होत गेली, जंगल तोड झाली, वस्ती वाढली, सिमेंट ची घरे होऊन जंगल नष्ट झाली आहेत. पावसाचे पण ते दिवस आता नष्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या काही वर्षा चा संततधार पावसाने पुर्वीचे वैभव येत असल्याचे जुने जाणकार मंडळी बोलत आहेत.

नवापूर तालुक्यात आज अखेर 532 मीमी पावसांची नोंद
पावसाची रिपरिप कायम असल्याने लोक कामा पुरते घराचा बाहेर निघत आहे लघु व मध्यम प्रकल्पात पाणी साठा वाढला आहे. नवापूर तालुक्याचे पर्जन्यमान सुमारे दिड हजार मि.मि. असुन आज अखेर 532 पाऊस झाला आहे. जुनमध्ये लागवड केलेली पीके वाया जातील असे वाटत असतांना या पावसामुळे पीकांची स्थिती चांगली असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. तसेच रायंगण, खेकडा, सोनखडके व इतर लघु व मध्यम प्रकल्पात पाणी साठा वाढला आहे जमिनी तील पाण्याची पातळी देखील या संततधार पावसाने वाढली असुन हात पंपाना देखील चांगले पाणी आले आहे. सततधार पावसामुळे शाळेतील विद्यार्थीची उपस्थिती कमी झाल्याचे दिसून येत आहे.

पावसाची आतापर्यंतची स्थिती
सर्वत्र चिखल व पाणीने रस्त्याची पार वाट लागली आहे. सर्वत्र हिरवळ पसरले असून थंडा थंडा कुल कुल वातावरण झाले असून रेनकोट, छत्री, टोपी बाजार पेठेत विक्रीस आले आहेत. जुन अखेर 454 मि मि पाऊस झाला. तर जुलै महिन्यात 145 मि मि पाऊस झाल्याची नोंद आहे आता पर्यंत 464 मि मि पावसाची नोंद झाली आहे जिल्हात 2633 मि मि पावसाची नोंद आता पर्यंत झाली आहे कुठे ही आता पावसामुळे नुकसान झाल्याची नोंद नाही.