नवापुरात बोट उलटून ७ जणांना जलसमाधी

0

नवापूर: रंगपंचमीचे औचित्य साधुन ऊकाई धरणाच्या किनारी सहलीवर गेलेल्या १३ जणांपैकी सात जणांना जलसमाधी मिळाली आहे. शहरापासुन पाच कि.मी. अंतरावरील सुंदरपुर येथील मृतांचा समावेश आहे. अद्यापी दोनच मृतदेह हाती लागले असुन अन्य जणांचा शोध घेतला जात आहे. शहरापासुन पाच कि.मी. अंतरावर असलेल्या सुंदरपुर येथील रहिवाशी व भारतीय स्टेट बॅकेच्या उच्छल शाखेत शिपाई असलेले राजेश बाळिराम कोकणी व अन्य १२ जवळच्या वंजारी येथुन ऊकाई धरणाच्या साठलेल्या पाण्यातुन दोन बोटीने पलिकडे सहलीसाठी गेले होते. परतीच्या प्रवासात वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने बोट हेलकावे घेउ लागली होती. बोटीमध्ये असणारी लहान मुले यामुळे घाबरली होती. त्यांना धीर देण्यासाठी राजेश कोकणी व अन्य ज्येष्ठ सदस्य उभे राहुन प्रयत्न करतांना बोटीचा तोल जात पाण्यात बोट उलटली

जवळच मासेमारी करणारे व वंजारी गावातील काहींनी धाव घेतली. मात्र त्याचा उपयोग होउ शकला नाही. राजेश बाळिराम कोकणी वय ३५, एन्जल डेवीड कोकणी ४, अभिषेक राजेश कोकणी १२,
संजना राजेश कोकणी १४, उर्मिला रतू कोकणी २१, रत्या सुकलाल कोकणी ९ व विनोद बुध्या कोकणी १७ या ७ जणांना जलसमाधी मिळाल्याची भिती व्यक्त होत आहे. या पैकी राजेश बाळिराम कोकणी व एन्जल डेवीड कोकणी या चिमुरडीचे मृतदेह हाती आले आहे.

सहलीवर गेलेले जिग्नेश भरत कोकणी गणेश रतु कोकणी , याकूब भिवसन कोकणी सुंदरपूर यांच्या सह वंजारी येथील जिग्नेश देवाजी गामीत, अमित पारत्या गामीत व अन्य एकास पोहता येत असल्याने वाचले. यापैकी जिग्नेश देवाजी गामीत याच्या नाकात पाणी गेल्याने व त्याची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला व्यारा येथे हलविण्यात आले आहे तर अन्य उच्छल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.