नवापुरात भारत फर्निचर मार्टेला शॉटसर्कीटमुळे आग

0

नवापूर। सुरत महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या भारत फर्निचर मार्ट मध्ये दुपारी बारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आगीत सागवानी लाकडासह इतर लाखो रूपयांचे साहित्याचे नुकसान झाले. भारत फर्निचर मार्ट चे मालक असद अब्बास कुरेशी यांनी इलेक्ट्रीक पोलवर शॉट सर्कीट झाल्याने आग लागल्याचे सांगितले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र व गुजरात मधील पाच-सहा शहरातील अग्निशमन दलाचा समावेश होता. आग नियंत्रित करण्यासाठी 20-25 अग्निशमन चे बंब लागले आहेत. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी जेसीबी च्या सहाय्याने लाकूड बाजूला केले जात होते.

हवेच्या वेगामुळे पसरली आग
हवेच्या वेग जास्त असल्याने आग झपाट्याने पसरत होती. आगीत जळाऊ लाकूड सह लाखो रूपयांचे सागवान लाकूड आगीत जळून झाक झाले आहेत.आग लागल्याने माजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री माणिकराव गावित, प्रांताधिकारी निमा अरोरा, पोलिस निरीक्षक रामदास पाटील, दिलीप बुवा,नायब तहसीलदार मिलिंद निकम वीज वितरण कंपनीचे अभियंते बी एस कोळे. वन विभागाचे अधिकारी आदींनी घटनास्थळी भेट दिली.आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आली नव्हती. आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती आग लागल्यावर आग डोब उसळत होता सो मील वरुन 132 के व्ही चा तारा गेल्यामुळे शहरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता सकाळी 11 पासुन वीज बंद होती प्रचंड उकाळ्याने लोक हैराण झाले होते