नवापूर । भारताचे वीरपुत्र महाराणा प्रतापसिंह यांची 477 वी जयंती नवापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात करण्यात आली. जयंती निमित्ताने क्षत्रिय राणा राजपूत समाज, महिला संघ व महाराणा प्रताप युवा सेना सप्ताह साजरा करण्यात आला. यात रांगोळी स्पर्धा, व्याख्याते प्रमोद राजपूत यांचे व्याख्यान, समाजातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, रक्तदान शिबीर व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात 50 युवकांनी सहभाग नोंदवला. त्याचबरोबर महिला संघाचा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम, नवापूर उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप, शोभायात्रा यादरम्यान शरबत वाटत असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
मुख्य मार्गावरून जयघोष
27 मे रोजी सकाळी दहा वाजता शहरातील मुख्य मार्गावरून जयघोष करीत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. मोठ्या संख्येने तरूणवर्ग शामिल झाला होता. त्यानंतर अकरा वाजता सराफ गल्लीत वीर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, नगराध्यक्षा रेणुका गावित, जिल्हा परिषद सदस्या संगीता गावित, उद्योगपती विपीन चोखावाला, तहसीलदार प्रमोद वसावे, राणा राजपूत समाजाचे अध्यक्ष संजय राजपूत, महिला अध्यक्षा शिला पाटील, युवा सेनेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष भिकन पाटील, माजी नगराध्यक्ष दामू बिर्हाडे, गिरीष गावित, नगरसेवक आरिफ बलेसरिया, हरिष पाटील, आर. आर. अग्रवाल, श्री शिवाजी हायस्कूलच्या अध्यक्षा प्रमिला पाटील, नगरसेवक अजय पाटील उपस्थित होते. यावेळी भरत गावित, विपिन चोखावाला, हेमंत पाटील यांनी महाराणा प्रताप यांची वीर गाथा सांगितली
कामगिरीबद्दल सत्कार
समाजातील दुखत प्रसंगी निस्वार्थपणे सेवा देणार संजय पाटील, प्रा.नवल पाटील, वनेसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, संजय पाटील, छगन पाटील, जगदीश पाटील, गोविंद पाटील यांच्यासह प्रतिभावंत विद्यार्थिनी सिध्दी पाटील मेडिकल कॉलेज प्रथम क्रमांक प्राप्त केला व शालिनी पाटील आयटी क्षेत्रात तृतीय वर्षात प्रथम क्रमांक मिळाल्याने सत्कार करण्यात आला. रसायनशास्त्र मोफत मार्गदर्शन करणारे प्रा.उमेश पाटील यांच्याही सत्कार करण्यात आला.
महाआरोग्य शिबिराचे आयोजन
30 मे रोजी महाराणा प्रताप चौकात विश्वनाथ पाटील, गणेश पाटील, केतन पाटील व जितेंद्र पाटील यांनी मोफत शस्त्रक्रिया महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे. सूत्रसंचालन जागृती पाटील व कमलेश पाटील यांनी केले तर आभार नीलेश पाटील व प्रशांत पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी वीर महाराणा उत्सव समितीचे अध्यक्ष सदस्य व राणा राजपूत समाजातील बांधवांनी परिश्रम घेतले. यावेळी रिना पाटील, शिरीष प्रजापत, माजी नगरसेवक विनय गावीत, मेघा जाधव, आशिष मावची, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हंसमुख पाटील, प्रकाश पाटील, शरद पाटील, अनिल वसावे, अमृत लोहार, एजाज शेख, शैला टीभे चुनिलाल पाटील, संजीव पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील, हेमंत जाधव, डॉ कमलेश पाटील,हिमाशु पाटील, डॉ. जयवंत गिरासे,गुलाबसिंग जमादार, भटूसिंग गिरासे,अय्युब बलेसरिया, शरद पाटील, सुरेश पाटील, धमू पाटील, गणेश वडनेरे, विजय सैन,शंकर दर्जी, दर्शन पाटील, आदी उपस्थित होते.