नवापुरात माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांनी केले अभिवादन

0

नवापुर। नवापुर शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याची 126 जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 9 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास आमदार सुरुपसिंग नाईक, माजी केद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत, जि.प, अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा रेणुका गावीत,उपाध्यक्ष हारुण खाटीक, आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिरीष नाईक, माजी जि.प. अध्यक्ष भरत गावीत, जि.प. सदस्या संगिता गावीत, माजी नगराध्यक्ष दामु बिराडे, उद्योगपती ऱमेशचंद्र अग्रवाल, तहसीलदार प्रमोद वसावे,बीडीओ नंदकुमार वाळेकर,योगेश चंद्रे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

याप्रसंगी उद्योगपती विपिन चोखावाला, नगरसेवक तथा गटनेते गिरीश गावीत, नगरसेवक आरिफ पालावाला,अय्युब बलेसरीया,अजय पाटील,चंद्रकात नगराळे,ज्योती जयस्वाल, मेघा जाधव,रिना पाटील, सुशिला अहिरे, रजीला गावीत, आशिष मावची, शिरीष प्रजापत, शेतकी संघाचे अध्यक्ष अजित नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिपक नाईक, माजी नगरसेवक विनय गावीत, हरीश पाटील, हेमंत जाधव, शरद पाटील, शैला टिभे,रऊफ शेख, डॉ.चंद्रशेखर पाटील, भरत पाटील, जी. के.पठाण, इम्तियाज लाखानी, इंद्रीस टिनवाला, अनिल वसावे, एजाज शेख, निलेश प्रजापत,आर व्ही पाटील, समितीचे अध्यक्ष शरद लोहार, उपाध्यक्ष महेश रामनानी, जगदिश पेंढारकर, संजय राणा, वामन अहिरे, आशिष मावची, विजय पाटील, सचिव अविनाश बिराडे, जितु अहिरे, सतिष गावीत, प्रसिध्दी प्रमुख दिपक वसावे, एम. एन. वसावे, दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील, सचिव महेंद्र जाधव, उपाध्यक्ष निलेश पाटील, आय. जी. पठाण, दर्शन पाटील, विजय सैन, शिवसेना जिल्हाउपप्रमुख हसमुख पाटील, तालुका प्रमुख गणेश वडनेरे, महेंद्र चव्हाण, कमलेश मोरे, जयंती अग्रवाल, किऱण टिभे, घनश्याम परमार,अनिल वारुडे आदींनीही पुष्पहार अर्पण केले. यावेळी प्रकाश ब्राम्हणे यांनी बुध्दवंदना म्हटली व अभिवादन कऱण्यात आले. सुत्रसंचालन दिनकर बेद्रे यांनी केले तसेच सांयकाळी डाँ बाबासाहेब आंबेडकर चौकातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.