नवापुरात राष्ट्रीय परिषदांचे आयोजन

0

नवापुर। येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात चार विषयावरील राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात आले. त्यात 160 संशोधक व अध्यापकांनी आपले संशोधनकार्याचे सादरीकरण केले. संस्थेचे उपाध्यक्ष हरिषभाई अग्रवाल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी डी देवरे अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सचिव तानाजीराव वळवी, संचालक जी. के. पठाण, नुरजी वळवी, अमरेली सुरत येथील डॉ. गिरीश राणा, सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. बी. एन. पाटील, अहमदाबादचे डॉ. हेमंत शाह, आणंद येथील डॉ. समीर पटेल, खंडवा येथील डॉ. सुनील गोयल, नागपुर येथील डॉ. मोहन काशीकर, प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, डॉ. अशोक पाटील आदि प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.

संशोधनासह अध्यापनाचे स्वरुप बदलले
राज्यशास्त्र विभागाकडून राखीव जागा : चळवळ व वास्तव या विषयावर तर अर्थशास्त्र विभागाकडून एकविसाव्या शतकातील भारतीय शेती: समस्या व आव्हाने या विषयावर तर इतिहास विभागाकडून महाराष्ट्रातील क्रांतीकारकांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि मानसशास्त्र विभागाकडून तरुणांच्या वर्तनाची भावनिक बुध्दीमत्ता हे विषय राष्ट्रीय परिषदांसाठी ठेवण्यात आले होते.माहितीचे महाजाळ निर्माण झाल्याने संशोधनासह अध्यापनाचे स्वरुप बदलत आहे. अध्यापक व संशोधकांनी त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडविणे आवश्यक असल्याचे मत सुरत येथील प्रा. डॉ. गिरिष राणा यांनी व्यक्त केले.

बीजभाषणाने परिषदांना सुरुवात
डॉ. गिरिष राणा यांनी आजच्या बदलत असलेल्या शिक्षण व्यवस्थेचा उहापोह करताना विद्याथ्यॉना वगॉतील ज्ञानापेक्षा जास्तीचे ज्ञान आवश्यक असुन ते ज्ञान देणारा शिक्षकच यापुढे टिकु शकेल असे सांगितले. सामाजिक शास्त्रातील चार विषयावर एकाच वेळी राष्ट्रीय परिषदांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजक महाविद्यालयाचे कौतुक केले. त्यांच्या बीजभाषणाने राष्ट्रीय परिषदांना सुरुवात झाली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पी डी देवरे यांनी येत्या शैक्षणिक वषॉत नवे शैक्षणिक धोरण आणले जाईल. नवीन धोरणात शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल प्रस्तावित असुन त्यावर आजच चिंतेचे सावट पसरले आहे असे सांगून नवापुर महाविद्यालयाचे कार्यक्षम प्रशासन असल्याने एकाच वेळी चार विषयांच्या राष्ट्रीय परिषदांचे आयोजन होत असल्याचे ते म्हणाले.

160 संशोधन पेपरांचे सादरीकरण
महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेच्या विचारमंथन या संशोधन पत्रिकेचे प्रकाशन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. ए जी जयस्वाल यांनी प्रास्ताविक करून अतिथींचे स्वागत केले. चार तांत्रिकसत्रांमधे चारही विषयांच्या राष्ट्रीय परिषदांमधे महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील संशोधक व अध्यापकांनी आपले संशोधन कायॉचे सादरीकरण केले. एकुण 160 संशोधन पेपरांचे सादरीकरण झाले. अतिथींचा परिचय प्रा. के के वाघ यांनी करुन दिला. सुत्रसंचालन प्रा. डॉ. आय. जी. पठाण व प्रा. एस. बी. बनसोडे यांनी केले. प्रा. एन. ओ. पाटील यांनी आभार मानलेत.