नवापुरात वीर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

0

नवापूर। शहरातील महाराणा प्रताप चौकात सालाबादाप्रमाणे वीर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिममापूजन, फलक अनावरण तसेच महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहराज्यमंञी माणिकराव गावित होते. यावेळी हरचन पाटील यांनी महाराणा प्रताप यांच्या वर कविता सादर केली.

पदाधिकार्‍यांसह शासकीय अधिकार्‍यांची उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. अध्यक्ष भरत गावीत, तहसीलदार प्रमोद वसावे, बीडीओ नंदकुमार वाळेकर, माजी नगराध्यक्ष दामु बिराडे, कांतीलाल पाटील, पांडुरंग पाटील, राजपुत समाजाचे अध्यक्ष संजय राजपूत, रमेश पाटील, हरजन पाटील, उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील, नगरसेवक अजय पाटील, संजीव पाटील, पञकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते हरीश पाटील, जाधव सर, शरद पाटील, शंकर दर्जी, राजू गावीत, बीरसिंग पाटील, विश्वनाथ पाटील, दर्शन पाटील, धमु पाटील, परशु पाटील, हेमंत जाधव, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष गणेश वडनेरे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अनंत पाटील, संजय राणा, मनोज पाटील, विजय पाटील, संजय राजपूत, संजय पाटील, शरद पाटील, गोटु पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुञसंचलन अनंत पाटील यांनी केले तर आभार संजीव पाटील यांनी मानले.