नवापुरात स्वच्छता अभियानास प्रतिसाद

0

शहरातील नगरपालिका, बसस्थानक परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती, मेमनगल्ली व नवभारत हाऊसिंग सोसायटी चकाचक

नवापुर  । न वापुर शहरात आज स्वच्छ भारत अभियान अंतर्गत १५ सष्टेंबर २०१७ ते २ ऑक्टोंबर २०१७ पर्यंत स्वच्छता हिच सेवा हा विषय घेवुन मोहिम राबविणे बाबत निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार आज सोमवार २५ सष्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान जि.प अध्यक्षा सौ.स्व हेमाताई पुतळापासुन ते बसस्थानक परीसरापासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यत स्वच्छता अभियांन राबविण्यात आले. यावेळी,नवापुर नगरपालिका व नवापुर एस.टी.आगार विभाग मार्फत अभियान राबविण्यात आली. यावेळी न.पा मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे, आगार प्रमुख आर.एस.अहिरे, कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे, आरोग्य निरीक्षक भरत पाटील, बांधकाम विभागाचे अभियंता सुधिर माळी, प्रकल्प अधिकारी प्रशांत भट, राजेंद्र चव्हाण, प्रेमलाल गावीत, सतिष बागुल, वामन अहिरे,रमेश सोनार,राजु गावीत, आगार विभागाचे कर्मचारी ज्ञानेशवर पवार, वंसत गावीत सह सर्व एस.टी कर्मचारी यांनी हातात झाडु घेऊन पुर्ण परीसर स्वच्छता केली. एस.टी बस मधील प्रवासी यांना स्वच्छेते बदल माहिती आगार प्रमुख यांनी दिली.

नवभारत हाऊसिंग सोसायटी स्वच्छ
नवापुर शहरातील मेमनगल्ली व नवभारत हाऊसिंग सोसायटी येथे स्वच्छ भारत मिशन राबविण्यात आले. यावेळी गल्लीतील डॉ.रऊफ कुरेशी, खल्लील खाटीक, ईश्वर प्रजापत, रियाज मन्सुरी, अकबर सैय्यद, उफरान खाटीक, मुदतसिर सैय्यद, मुसा बागवान, इकबाल खाटीक, अबजल बागवान, डॉ.उमराव चौधरी, इरफान मन्सुरी, गिरीष अग्रवाल, आदीनी पुर्ण परीसर स्वच्छता केला. तसेच नाल्या किनारी पण फार कचरयाची समस्या होती. स्वता जागृत नागरीकांनी स्वच्छ केली. यावेळी या भागातील महिलांनी पण समाधान व्यक्त केले आहे.

बाजार समितीत विके्रत्यांचा प्रतिसाद
स्वच्छता ही सेवा अभियांना अंतर्गत आज कृषीउत्पन्न बाजार समिती अंतर्गत मुख्य आवार नवापुर येथे बाजार समितीचे सभापती दिपक नाईक व उपसभापती भानुदास गावीत व संचालक माजी नगराध्यक्ष दामु बिराडे, दिलीप पवार, नवलसिंग गावीत व कर्मचारी सचिव अमोल पिंपळे, सुधाकर वळवी, जाकीर शेख, उमेश पाडवी, सुभाष गावीत, लियाकत पठाण, असरार पठाण यांनी हातात झाडु घेऊन पुर्ण परिसर स्वच्छता केला. यावेळी भाजी पाला आवार व मुख्यबाजार मार्कट परिसर व शेतमाल लिलावगृह स्वच्छता करण्यात आली. तसेच परिसरातील विक्रीते यांना स्वच्छते बदल माहीती सचिव अमोंल पिपळे यांनी दिली. ते म्हणाले की आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहीजे, स्वच्छता हिच सेवा आहे. तसेच भाजीपाला व्यापारी यांनी व भाजीपाला आवारातील इतर व्यवसायिक लोकांनी टाकाऊ कचरा आपल्या बाजार समितीचा आवारात नगरपालिकेने ठेवलेल्या कचरा कुंडीत टाकावा असे आवाहन केले.