नवापुरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

0

नवापुर । नवापुर शहरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या निमित्त 10 रोजी भजन संध्याचे आयोजन करण्यात आले. सोन्या मारुती व श्री शनि मंदीराच्या 8व्या वर्धापन दिना निमित्त माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत यांच्या मातोश्री स्व सुरेखाबाई माणिकराव गावीत यांच्या स्मरणार्थ भक्ती रसाने तृप्त होण्यासाठी हनुमान जयंतीच्या निमित्ताने ओम म्युझिकल आँकेस्ट्रा यांच्याकडुन ततगग ‘एक शाम हनुमानजी के नाम’ भक्ती गीतांचा कार्यक्रम सरदार चौक येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत व जि.प.सदस्या संगिता गावीत यांच्याहस्ते दिप प्रज्वालन करुन करण्यात आले.

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
यावेळी नगरसेवक अजय पाटील नगसेविका मेघा जाधव, सुशिला अहिरे, शैलाबाई टिभे, ज्योत्स्ना पाटील, चंद्रवदन पाटील, हेमंत जाधव, मंदीराचे विश्वस्त शरद पाटील, हिमांशु पाटील, हरीष पाटील, बाळासाहेब पवार, संतोष आहेर, अजय राणा उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार शरद पाटील व मंदीराचे विश्वस्त यांनी केले. यानंतर भक्ती गीतांच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुञसंचलन नारायण मराठे यांनी केले. दि 11 एप्रिल रोजी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नवापुर शहरालगत असलेले रोकडोबा हनुमान मंदीरात, महात्मा गांधी पुतळ्या समोरील हनुमान मंदीरात रात्री आठ वाजेपर्यंत गर्दी होती.