नवापूर । शहरातील वार्ड क्रं 3 मधील एकमेव पाणीचे मुख्य हातपंप ज्यापासुन संपुर्ण शास्त्री नगर व जनता पार्क गं. न.ं 1 पुर्ण एवढा मोठा परीसर उन्हाळ्यात पाणी भरत असुन हे हातपंप 15 दिवसांपासून बंद झाले आहे. हातपंप बंद असल्याने रहिवासी व परीसरातील लोकांना पाण्याच्या समस्येने त्रस्त कले आहे. येथील रहिवासी दिपांजली गावीत, लतीफ खाटिक, जुबेर शेख यांनी न.पा.मुख्याधिकारींना निवेदन देऊन हातपंप दुरूस्तीची मागणी केली आहे.
तरतूद हवी
या भागातील हातपंप दुरूस्ती स्वत:उपस्थित राहून करवून घेतले आहे. तसेच शेफाली पार्क या भागात देखील किरकोळ पाणी टंचाई भासत असुन पाणीच येत नसल्याची ओरड आहे. याभागात पाईप लाईनतुन पाणीवर चढत नसल्याने या भागात पाणी टंचाई ही कायम आहे यावर कायमस्वरुपी योजना करण्याची मागणी या परिसरातील रहिवाशांची आहे.