नवापूर। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणीत) त्र्यंबकेश्वर गुरुकूल पीठाधीश प.पु.गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांचे 1मे रोजी नवापूर येथे हितगुज व राष्ट्रीय सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याची माहीती नवापूर केंद्राचे जेष्ठ सेवेकरी अशोक रणधीरे यांनी दिली.
दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
नवापूर येथील बसस्थानक जवळील श्री शिवाजी हायस्कुलच्या मैदानात हा सोहळा होणार आहे. सोहळ्याचा दिवशी सकाळी भुपाळी आरती, दुर्गा सप्तशती पाठ, नैवद्य आरती, श्री स्वामी चरित्र वाचन, किर्तनकार गणेश करंजकर यांचे किर्तन व दुपारी 3 वा गुरुमाऊली यांचे हितगुज सत्संग सोहळा संपन्न होईल. या सोहळ्यात गुरुमाउलींचे स्वागत आदिवासी संस्कृति दर्शनाने होईल. या सोहळ्यासाठी 25 ते 30 हजार भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. या मेळाव्यात मराठी अस्मिता, भारतीय सण, उत्सव व्रतवैकल्य यांची माहीतीसह मुद्रण विभाग,आयुर्वेदीक विभाग आरोग्य विभागाचे स्वतंत्र दालन असणार आहे या ठिकाणी भाविकांना संपूर्ण मौलिक माहिती दिली जाणार आहे मेळावा यशस्वितेसाठी दि 25 ते 30 एप्रील पर्यंत संपुर्ण तालुक्यात प्रचार व प्रसारासाठी ’विजयरथ’ प्रचार व प्रसार करीत आहे आहे. या राष्ट्रीय सत्संग सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवार नवापूर केंद्रमार्फत करण्यात आले आहे.