नवापुरात 4 जानेवारीपासून स्वच्छता सर्वेक्षण

0

नवापूर । केंद्र शासनद्वारे सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून नवापुर नगर परिषदतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2018 हा केंद्र शासनाचा स्वच्छतेच्या मुल्यांकमाचा उपक्रम 4 जानेवारी 2018 पासुन सुरु होत आहे. या मुल्यांकन उपक्रमामध्ये नवापुर शहराला उच्चतम गुण प्राप्त करुन स्वच्छतेच्या बाबतीत शहराला अव्वलस्थानी आणण्यासाठी शहरवासीयांच्या सहाकार्य करावे, असे आवाहन मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे व आरोग्य निरीक्षक भरत पाटील यांनी केले. ओला व सुका कचर तसेच हगणदारीमुक्तीसंदर्भातील आदेशांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

दंडाची कारवाई टाळा
ओला व सुका कचरा वेगवेगळा करुन नगरपालिकेच्या घंटागाडीत देणे, खुल्यावर शौचास बंदी, कचरा रसत्यावर इतरत्र टाकु नये या बाबीचा कडक अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. जे नागरीक या बाबींचा अमंलबजावणी करत नाहीत.त्याच्यावर घनकचरा बाबत मंजुर उपविधीतील मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यात विविध कलमान्वये दंडाची रक्कम ठरविण्यात आली आहे. नवापुर नगरपरिषदच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये क्रमांक येण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे व दंडाची कटु कारवाई टाळावी, असे अहवान मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे व आरोग्य निरीक्षक भरत पाटील यांनी केले आहे.