नवापुर। नवापुर शहरालगत असलेले शासकीय विश्राम गृह रोडवर फिर्यादी शिरीष कुमार प्रजापत यांचे ए.बी पार्क प्लाट नंबर 7 व 8 वरील नविन बांधकाम केलेल्या तीन बंगल्यातील पहिल्या बंगल्यातुन 23 ते 25 फेब्रवारी दरम्यान फिर्यादीचा बंगल्याचा दरवाज्याचे कुलुप तोडुन चोरटयांनी एकुण 93 हजार 100 रुपयांची 24 क्विटल 50 किलो पांढर्या रंगांचे तुरीचे 49 कट्टे चोरुन नेले होते. यासंदर्भांत नवापुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचोरीतील सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नवापुर पोलीस ठाण्यात याबाबत 25 फेब्रवारी रोजी गुन्हा दाखल करुन पोलिस उपनिरीक्षक ताथु निकम यांच्याकडे तपास करीत होते.
गुजराथ, महाराष्ट्रात चोरी केल्याचे तपासात निष्पन्न
निकम यांनी गुप्त माहीती काढुन जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दहाडे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत वाघुडे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी गावीत, पोलिस निरीक्षक रामदास पाटील व सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा यांचा मार्गदर्शन खाली पोलिस उपनिरीक्षक ताथु निकम पो.का महेंद्र नगराळे, दिलीप चौरे, योगेश थोरात, शांतीलाल पाटील, हितेश पाटील, किरण धनगर यांनी बातमी काढुन सतत माहीतीचा पाठपुरावा करुन अखेर आरोपी अतेश अभीमान मावची उर्फ अविनाश, राजु गावीत दोघे राहणार नया होडा नवापुर ,जयसिंग उर्फ प्रभु दिल्या मावची, सुनिल देविदास मावची दोघेे राहणार झामझर ता.नवापूर, राजु उर्फ राजेशभाई इबराइमभाई गामीत, विपुल दिलीप गावीत रा. वडपाडा भित तालुका उच्छल गुजराथ यांना अटक करुन त्यांचा कडुन मुदेमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपी विरुध्द नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.