नवापूर। नवापूर मर्कन्टाईल को-बँक लि ची सन 2017-18 ते 2022-23 व्यवस्थापक समितीची निवडणुक बिनविरोध पार पडली. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्राधीकृत अधिकारी पी. बी. पाडवी यांच्या अध्यक्षस्तेखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणुक घेण्यात आली. यात सरला गोविंदराव वसावे यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी जितेंद्र धीरजलाल देसाई यांची एकमताने निवड करण्यात आली.
व्यवस्थापक समिती मध्ये जितेंद्र धीरजलाल देसाई, नंदकिशोर काशिनाथ सोनार, अनिलभाई सुदाम पाटील, विनयकुमार गोविंदराव वसावे,डॉ. सुनिल छगन पाटील, डॉ. जी. एम. वळवी,मुरलीधर वेडु दुसाणे, हेमंत इंद्रवदन शहा हे संचालक सर्वधारण गटातुन बिनविरोध निवडून आलेत. तर सरला गोविंदराव वसावे, मरियमबी महंमद ताई हे महिला मतदार संघातुन बिनविरोध निवडुन आले आहे. शिवाजी गावीत हे अनुसुचित जमाती मतदार संघातुन तर इतर मागास वर्ग प्रवर्गातुन चंद्रकांत सोनार व भटक्या विमुक्त जाती जमाती मधुन चंद्रशेखर बेंद्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे व्यवस्थापक नारायण चौधरी यांनी आभार मानले.