नवापुर। नवापुर शहरातील तीनटेंबा ते लालबारीपाडा येथे नवापुर नगरपालिका महाराष्ट्र सुवर्ण् जयंती नागरी नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत पाण्याचा टॉकीचे बांधकाम करणे व पाणीपुरवठा वितरीत करणे या 1कोटी 54 लाखाचा विकास कामाचा शुभारंभ माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत व आदिवासी सहकारी कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा रेणुका गावीत,उपनराध्यक्ष हारुण खाटीक,गटनेते गिरीष गावीत,विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, बांधकाम सभापती आयुब बलेसरीया,नगरसेवक अजय पाटील,चंद्रकांत नगराळे,आरीफ पालावाला, अजित नाईक, शिरीष प्रजापत,आशिष मावची, प्रा.ज्योती जयस्वाल,मेघा जाधव, रिना पाटील, सुशिला अहिरे, रजीला गावीत,सईदा शेख, अनिता मावची, मिलिंद भामरे,माजी नगरसेवक विनय गावीत,रमला राणा, प्रा नवल पाटील,हेमंत जाधव,जयनु गावीत,भालचंद्र गावीत, आदी उपस्थित होते.
निवडणूकीतील आश्वसानांची पुर्तता
यावेळी माजी जि.प. अध्यक्ष भरत गावीत म्हणाले की आमदार सुरुपसिंग नाईक व माजी खासदार माणिकराव गावीत यांच्या प्रयत्नाने नवापुर शहरात सौर उर्जा अंतर्गत पथदिवे कामासाठी 3 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. याकामाचा लवकरच शुभारंभ होणार असल्याचे सांगितले. निवडणुकीत दिलेल्या कामांचा आश्वासनाची पुर्तता करीत आहोत. यामध्ये नाल्याच्याकामासाठी 2कोटी 20 लाख रुपयाची कामे पुर्ण होणार असून करंजी ओवरा नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत 4 कोटीचा पुलाचे काम पुर्ण झाले आहे.
विकास कामांना साथ द्या
विरोधकांचा भुलथापाना बळी पडु नका.विकास कामानां साथ दया असे गावीत यांनी सांगितले. आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिरीष नाईक यांनी जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कल्लशेट्टी यांच्या प्रयत्नांनी बर्याच विकास कामाना चांगला चालना मिळाली असल्याचे सांगितले. कॉगे्रसची सत्ता आहे आणि यापुढे पणराहाणारच आहे असे स्पष्ट केले. सुत्रसंचालन विनय गावीत यांनी तर आभार न.पा गटनेते गिरीष गावीत यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुधिर माळी,राजेंद्र चव्हाण,राजु गावीत,बागुल आदींनी कामकाज पाहिले.