नवापुर येथे मुस्लीम समाजातर्फे अमरनाथ हल्ल्याचा निषेध

0

नवापुर। नवापुर शहरातील जुम्मा मशीद ट्रस्ट व मुस्लीम समाजातर्फे पविञ अमरनाथ याञेकरुंवर झालेल्या हल्याचा तिव्र निषेध बाबतचे निवेदन नायबतहसिलदार राजेंद्र नजन व सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा यांना देण्यात आले. नवापुर जुम्मा मशीद ट्रस्टचे पदाधिकारी नवापुर शहरातील तमाम मुस्लीम समाजातर्फ पवित्र अमरनाथ याञेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्लाचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
या हल्यात असहाय्य लोकांची हत्या करण्याचे अतिरेक्यांनी केलेले हे कृत्य मानवतेला काळीमा फासणारे आहे.या अतिरेकी हल्यात मृत झालेल्या भाविकांना आदरांजली वाहतो. हल्यात निरपराध अशा 7 भाविकांचा मृत्यृ झाला.ज्या अतिरेक्यांनी हे कृत्य केले. यात जम्मू- कश्मीरसह देशभरात अतिरेकी कारवाया करणार्‍या सैतानी प्रवृत्तिच्या अतिरेक्यांवर कोम्बींग आँपरेशनकरुन त्यांचेविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.याभ्याड हल्याचा मुस्लीम समाज तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. यावेळी हाजी याकुब टीमोल,हाजी गुलाम व्होरा,हाजी सलाम आमलीवाला, हाजी जी.के.पठाण,हाजी सोहेल बलेसरीया ,हाजी इसमाईल बलेसरीया, हाजी जियायोदिन सैय्यद, हाजी आरीफ बलेसरीया, हाजी हारुण खाटीक, हाजी अबास कुरेशी,कलीम पठाण,मेहमुद खाटीक,वाही मनियार,इसुब कायदावाला उपस्थित होते.