नवापूरच्या कटलरी व्यावसायीकाचा गळफास घेऊन मृत्यू

0

नवापूर: शहरातील शीतल सोसायटीतील रहिवासी व कटलरी व्यावसायीक असलेल्या हिंमतराव शिवरामजी पुरोहित (40) यांनी दहिवेलजवळ जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुरोहित यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परीवार आहे.