नवापूर- शहरात दोन भामट्यानी संमोहनाने एकास लुटल्याची घटना घडली. दोन अज्ञात इसम शहरातील मंदिराचा आवारात फिरत असताना सराफ गल्लीतील आशापुरी मंदिर भागात टेहाळणी केली व तेथून ते हनुमान मंदिरात व नंतर जलाराम मंदिरात गेल्यावर तेथे मंदिरात दर्शन घेऊन बाहेर जात असलेल्या सुरेश नगीनदास छत्रीवाला (73) यांचा एकाने दुचाकीवरून पाठलाग करीत हॉटेल रंगूनजवळ त्यांना थांबवत मला मंदिरात दान करायचे आहे, असे सांगुन गाडीवर बसवत मंदिरात आणले. ा इसमाने 1 हजार रुपये मंदिराचा मुर्ती जवळील पादुका जवळ ठेवले. नंतर झेंडुची फुले, बिस्किट,लाल रंगाचे कापड व सुरेश छत्रीवाला यांचा हातावर ठेवत नंतर डोळ्याला ही ते लावले व पाचशे रुपये सुध्दा दिले ही माझी मानता असल्याचे सांगितले. तेवढ्यात सुरेश छत्रीवाला यांची शुध्द हरपली व त्यांनी आपल्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन, पाच गॅ्रमची अंगठी त्या इसमाला काढून दिली. मंदिरातील पुजारी यांच्या पत्नीनेदेखील ी आपल्या गळ्यातुन पाच ग्रॅमची चैन काढून दिली. पुजारी यांच्या पत्नीला धुण्यासाठी स्वच्छ पाणी आणायला सांगितले त्या आणायला गेल्यावर त्या इसमाने तेथुन पोबारा केला. पाच मिनिटांनी सुरेश छत्रीवाला व पुजारी यांच्या पत्नी भानावर आल्यानंतर त्यांना फसगत झाल्याचे लक्षात आले. घटनास्थळी झेंडुची फुले, लालकापड, बिस्किटे तेथे पडलेली होती. या दोन भामट्याने त्यानंतर गुजरातमधील सोनगड,चिखली या गावात ही याच पध्दतीने लोकांना फसवुन लुटल्याची घटना घडल्याचे सांगण्यात आले.