नवापूरच्या देवळफळी भागात पाणपोईचे उद्घाटन

0

नवापूर । नवापूर शहरातील अल्पसंख्याक विकास परिषदेतर्फे स्व.सुरेखाबाई माणिकराव गावित यांच्या स्मरणार्थ शहरातील देवळफळी भागातील जुनी पाण्याचा टाकीजवळ पाणपोईचे उद्घाटन माजी जि.प अध्यक्ष भरत गावित यांच्या हस्ते झाले. यावेळी पं.स उपसभापती दिलीप गावीत, नगरसेवक अजय पाटील, अल्पसंख्याक विकास परिषदचे जिल्हा अध्यक्ष प्रा.पमा सैय्यद, हेमंत जाधव, विजय तिजवीज, जयेंद्र चव्हाण, इकबाल पठाण, सुनिल वाघ, जयनु गावीत, दानीस मनसुरी, आरीफ घडीयाली आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष इरफान मुल्ला, माजी जिल्हा उपाध्यक्ष इमतियाज वालोडीया यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत यांनी शाल देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला. जन सेवा ही प्रभु सेवा आहे अशा उपक्रमासाठी प्रत्येक समाजाने पुढाकार घ्यावा असे गावित यांनी यावेळी सांगितले. या नंतर अल्पसंख्याक विकास परिषदचे जिल्हाअध्यक्ष प्रा. पमा सैय्यद यांनी पाणपोईसाठी कायमस्वरुपी ही जागा दयावी या बाबतचा ठराव नगरपालिकेने करावा अशी मागणी केली. कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा.पमा सैय्यद यांनी केले.