नवापूर । नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसलेल्या नवापूरच्या प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्र व गुजरात राज्यातील अधिकारी अलर्ट होऊन एकमेकांना सहकार्य करत काम करत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र-गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात असल्याने सीमावर्ती भागात कश्या पद्धतीने बंदोबस्त सुरू आहे, किती ठिकाणी बोर्डर सील केली आहे. लॉकडाऊनमध्ये दळणवळणाची काय परिस्थिती आहे. त्याची पाहणी करण्यासाठी गुजरात राज्यातील तापी जिल्हा पोलीस अधीक्षक नरेंद्र चौधरी नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा गावानजीक भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, तहसीलदार उल्हास देवरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र नजन, महाराष्ट्र आरोग्य टीम, गुजरात उच्छल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निखिल भोया, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास गावित आदी उपस्थित होते. सोबत वैद्यकीय पथक कार्यरत होते.
गुजरात व महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग महसूल विभागाच्या अधिकार्यांनी सीमावर्ती भागातील गावांची पाहणी केली. नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग महामार्गावरील पेट्रोलिंग कश्या पद्धतीने सुरू आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. दोन्ही राज्यातील पोलीस यांची विशेष भेट झाली. जिल्ह्यात कोरोनाचे सात रुग्ण झाले आहेत. तापी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळले आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील पोलीस विभागाचे अधिकार्यांनी संयुक्त भेट करून सीमा सिलिंग संदर्भात उपाययोजना केल्या आहेत.
नागरिकांनी काळजी घेण्याच्या अधिकार्यांकडून सूचना
कोणीही गुजरात राज्यात जाणार नाही. गुजरात राज्यातून एकही व्यक्ती महाराष्ट्रात येणार नाही. प्रत्येक व्यक्तिची आरोग्य तपासणी केली जात आहे. तब्येत खराब असली तरी औषधे दिले जात आहे. दोन्ही पोलीस दलाचे आरोग्य विभागाचे महसूल विभागाच्या अधिकार्यांनी नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना रुग्णात अजुन तीनची भर पडल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 7 झाल्याने चिंतेत अधिकच भर पडली असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.