नवापूरच्या सुपुत्राचे कोरोनावरील लेख अमेरीकन जर्नलमध्ये

0

नवापूर:नगावं येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. मनोज दिलीप पाटील यांनी लिहिलेला कोरोना वरील लेख अमेरिकेन जर्नल ऑफ फार्मासुटीकल एज्युकेशनमध्ये प्रसिद्ध होणार आहे.
कोरोना अर्थात covid १९ या विषाणू वर त्यांनी लेख लिहून ऑनलाईन पाठवला होता. या लेखाची निवड झाल्याचे प्रा. मनोज पाटील यांना अमेरिकन जर्नल चे मुख्य संपादक प्रा. डॉ. टिमोथी ब्लूम यांनी कळविले आहे . जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. या लेखातून जगभरातील तज्ज्ञांना मार्गदर्शन मिळणार आहे . कोरोणा बद्दल जागरुकता व कोरोना वर मात करण्यासाठीची ही उपायजोजना या उद्देशाने लिहिला गेलेला हा लेख आहे . प्रा. मनोज पाटील यांनी सांगितले की कोरोना कसा होतो आणि त्याला रोखण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत व कोणकोणत्या औषधी उपयोगात पडू शकतील या बद्दल ची सविस्तर माहिती त्यांनी या लेखातून दिली आहे. त्यांचे संस्थेचे सचिव बाळासाहेब मनोह भदाणे, व्हाईस चेअरमन
ज्ञानज्योती भदाणे , चेअरमन रामदादा भदाणे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिलकुमार टाटिया , उप प्राचार्य डॉ सुफियान अहमद व सहकारी प्राध्यापकांनी कौतुक केले.
मनोज दिलीप पाटील हे नवापूर शहरातील जनता पार्क भागातील रहिवासी असून रिटायर्ड पोलिस कर्मचारी दिलीप पाटील यांचे पुत्र आहेत.