नवापूर । नवापूर तालुका आरोग्य विभाग पंचायत समिती व नवापूर उपजिल्हा रुग्णालयातर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य व स्वच्छता दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दौडला हिरवी झेंडी दाखवून तहसीलदार प्रमोद वसावे व गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी उद्घाटन केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश मावची, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वळवी, डॉ.योगेश वळवी, डॉ.डी. एम. सोनार, डॉ.धिरेंद्र चव्हाण, डॉ.विश्वास नाईक, डॉ.सुरेश देसाई, डॉ.देवीदास चौधरी, डॉ.सखाराम वळवी आदी उपस्थित होते.
या दौडचा शुभारंभ पंचायत समिती कार्यालयाचा आवारापासून करण्यात आला. ही दौड लाईट बाजार, कुंभारवाडा, शिवाजी रोड, सरदार चौक, बसस्थानक या मार्गाने करण्यात आली. दौडचा समारोप तहसील कार्यालय परिसरात करण्यात आला. दौडमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी आरोग्यासंबंधी घोषणा दिल्या. यावेळी डॉ.अविनाश मावची म्हणाले की, 15 ते 29 वयोगटातील आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे नैराश्य भावना पसरत चालल्याचे दिसून येत आहे. यासाठी तणावमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे. हसा खेळा व तणाव मुक्त रहा व्यसनाला दुर ठेवा असा सल्ला त्यांनी दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक परदेशी, दिनेश वानखेडे, सचिन लोहारे सह सर्व पं.स कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.