नवापूर । नागपूर सुरत महामार्ग क्रमांक सहावर नवापूर नवरंग रेल्वे गेटजवळ ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही चालकांसह तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेत एकूण 12 प्रवासी जखमी झाले आहेत. माहितीनुसार इंदोर-सुरत खाजगी बस धुळ्याकडून सुरतकडे जात असताना समोरून येणारी ट्रक यांची सकाळी सहा वाजता समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ बचाव कार्यासाठी धावले. सर्व जखमी प्रवाशांवर नवापूर उपजिल्हा रूग्णालय येथे उपचार सुरू आहेत. या अपघातात ट्रकचालक राजेंद्र बडगुजर (42) रा. उंदीरखेडा पारोळा, बसचालक सिताराम चौथमल (30) रा.इंदोर मध्यप्रदेश, मुन्नाश्री ठाकुर (52) कसली, ग्वालियर मध्यप्रदेश हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत ट्रक चालक राजेंद्र बडगुजर ट्रकच्या कॅबीन मध्ये अडकले असल्याने त्यांना तासभरानंतर बाहेर काढण्यात आले.