नवापूर:लॉकडाऊनच्या तिसर्या टप्यात जिल्हाधिकार्यांनी शासनाच्या निर्देशानुसार दुकाने उघडण्यास सूट दिली होती. नवापूर शहरात सूट दिल्याने दोन दिवसांपासून व्यापार्यांनी दुकाने सुरू केली होती. सामान्य दुकानदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असतांना शुक्रवारी, 8 रोजी सकाळी मुख्याधिकारी, नगर परिषद कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाच्या ताफ्याने दुकानदार सोशल डिस्टनसिंगचे पालन करत नसल्यामुळे 12 दुकान मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही दुकानदारांनी पोलीस गाड्यांचा ताफा बघताच दुकाने बंद करून घेतली होती. अशा दुकानदारांना पुन्हा दुकाने उघडायला लावून कारवाई करण्यात आल्याने अगोदरच लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होऊन होरपळलेल्या शहरातील व्यापार्यांमध्ये असंतोष पसरला आहे. दुकाने उघडण्याची वेळ 8 ते 12 वाजेपर्यंत दिल्यावर या वेळेच्या आत होत असलेल्या दंडात्मक कारवाईने आश्चर्य व्यक्त होत आहे.
खांडबारात तीन दिवस कडकडीत बंद
शहरात अद्याप एकही कोरोना बाधीत रुग्ण नसल्याने सर्व बिनधास्त असतांना नवापूर तालुक्यात खांडबारा शहर आष्टा कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. खांडबारा शुक्रवार ते रविवार कडकडीत बंद राहणार आहे. सोबतच किराणा, मेडीकलही बंद राहणार आहे.
प्रशासनाला सहकार्य करा
नवापूरचे प्रशासन चांगले काम करीत आहे. कारण गर्दी आवरणे कठिण जाईल. नाही तर शहराला कोरोनाची एन्ट्री करण्यासाठी वेळ लागणार नाही. प्रशासनाला सहकार्य करा आणि आदेशाचे पालन करा. आपले शहर कोरोना मुक्त शहर आहे. कोरोना मुक्त शहर राहिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांनी दिली आहे. नवापूर शहरातील व्यापार्यांसह नागरिकांमध्ये दुकाने उघडण्यावरुन संभ्रम कायम आहे. दोन दिवसांपासून लोक बिनधास्त फिरत आहे. दुकाने उघडली असुन गर्दी वाढली आहे. व्यापारी दुकाने उघडण्यावरुन एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. जास्त भावाने वस्तूंची विक्री केली जात असल्याचे चर्चिले जात आहे.