नवापूरातील आगीत संसारोपयोगी वस्तू खाक

0

नवापूर । नवापूर शहरातील मध्यवर्ती टर्नल प्लॉट भागात घराला भीषण आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची दुर्देैवी घटना आज घडली. घरातील भरलेले गँस सिलेंडर सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला घर मालक दोन तीन दिवसा पासून बाहेर गावी असल्याने सिलेंडर जोडणी काढून सिलेंडर वर भांडे
ठेवलेले होते.

तीन लाखांचे नुकसान
धनसुख झिनाभाई चव्हाण हे कामानिमित्त परिवारासह बाहेर गावी होते. मध्य रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली असल्याचे स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आल्यावर पालिकेचा अग्निशमन दला ला पाचारण करण्यात आले परंतु अग्निशमन वाहन यायला उशीर लागत असल्याचे बघून नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला अग्नीशमन वाहन आल्यावर काही वेळेतच आगी वर नियंत्रण करण्यात आले, परंतु तो पर्यंत घरातील सर्वच साहित्य जळून खाक झाले होते सकाळ पर्यंत जळालेले साहित्य सरकवन्याचे काम सुरूच होते. लागलेल्या आगीत धनसुख भाई यांच्या घर जळून खाक झाले असून अडीच ते तीन लाखा चे अंदाजित नुकसान झाल्याचे समजते शेजारील घरात किरकोळ सामाना सहित संपुर्ण साहित्य जळाले आहे