नवापूर:शहरापासून २ किलोमीटर अंतरावरील राष्ट्रीय माहामार्ग क्र ६ वर मानस हॉटेलजवळ मोटर सायकल अपघात झाला. त्यात तापी जिल्ह्यातील व्यारा तालुक्यातील गिरिषभाई गावित (वय ४०) असलेला युवक मोटर सायकलने प्रवास करत असताना मानस हॉटेलजवळ अपघातात जागीच ठार झाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली. अपघाताबाबत माहिती समजू शकली नाही. नवापूर पोलिसांच्या मदतीने व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणले असून त्यांच्या नातेवाईकांना कळविले असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पवार यांनी दिली.
अपघाताचे सत्र वाढले
कोरोनाच्या काळात लाँकडाऊन सुरु झाल्यापासुन वाहनांची ये- जा बंद झाली होती. त्यामुळे अपघातही थांबले होते. महामार्गावर सन्नाटा पसरला होता. दोन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सुट दिल्यावर वाहने सुरु झाल्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. मजुरांना घेऊन जाणारे वाहने अजुनही सुरुच असुन वाहनांची संख्या वाढत आहे.महामार्गावर अपघात सुरु झाले आहेत.