नवापूरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक समस्या ठरतेय डोकेदुखी

0

नवापूर । शहरातील मेनरोड वरील ट्रॉफीक समस्या दिवसेन दिवस अत्यंत गंभीर व डोके दुखी होत आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही.मेनरोड व लाईट बाजार भागात ट्राफीक समस्येने नवापूरकर पार वैतागले आहे. या समस्येवर सर्वच ओरडतात पण काहीच उपाय योजना होत नाही. मेनरोड,लाईट बाजार,मच्छी मार्केट,लिमडावाडी या भागात ट्राफीक समस्येमुळे नागरीकांनी अनेक वेळा पोलीस व नगर पालिकेला तक्रारी केल्या आहेत. मागे जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली व उपाय योजना करण्याचे आदेश दिले मात्र काहीच झाले नाही. ये रे माझा मागल्या म्हणत काही दिवसांनी सर्व विसरले.

नागरिक आंदोलनाच्या तयारीत
आता नवापूरकर आंदोलनाच्या तयारीत आहेत. रोज या मार्गावर अनेक वाहने येऊन तासनतास ट्राफीक जाम होऊन गंभीर समस्या निर्माण होते. जडवाहनेमध्येच येतात तेव्हा तर तासन तास वाहतुक ठप्प होऊन भांडणे मारामारी हमरी तुमरी सारखे प्रकार घडतात. जडवाहने प्रवेश व वाहनांचा उदंड संख्या,अरुंद रस्ता,बेशस्त वाहने,पार्कीग झोन नाही हि कारणे गंभीर वाहतुक समस्येची आहेत.

पार्कींगची समस्या कायम
नवापूर शहरातील वाहतूक आणी पार्किंग समस्या अनेक वर्षे झाली कायम आहे. पार्किंग संदर्भात पालिका व पोलिस प्रशासन गंभीर नाही. वाहतुक संदर्भात पोलीसांनी कारवाई केल्यास पोलीस ठाण्यात राजकीय पुढारी आणि त्यांचे बगलबच्चे फोन करतात, पोलीसांवर दबाव आणतात. यातून कशी दूर होणार समस्या ? म्हणून आधी आपण सुधारावे नंतर इतरांकडे अपेक्षा करावी सुज्ञ नागरीक करत आहे.

ट्राफीकमुक्त नवापूरची अपेक्षा
नगर पालिका व पोलीस प्रशासन ट्राफीक समस्ये विषयी गंभीर नाही असे दिसुन येत असुन नवापूर शहराचा या गंभीर प्रश्‍नाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही एवढी मानसिकता बधीर झाली आहे असा सवाल केला जात आहे. ट्राफीक समस्येवर पोलीस नगर पालिकेने तातडीने महत्वाची बैठक घेऊन खास प्लँन तयार करावा.कायम स्वरुपी उपाय योजना करून ट्राफीकमुक्त नवापूर व गेट वे महाराष्ट्र पाहीजे आहे अशी अपैक्षा नवापूरकरांची आहे.