नवापूरातील लाईट बाजारात अखेर स्वच्छता

0

नवापूर । शहरातील लाईट बाजार, मेनरोड भागात तीन दिवसांपासून कचरा उचलला जात नाही अशी तक्रार या भागातील रहिवाशी व व्यापार्‍यांनी केल्यावर जनशक्तीने बातमी प्रसिध्द करताच काही तासातच आरोग्य सभापती तथा कार्यतत्पर नगरसेवक विश्‍वास बढोगे यांनी दखल घेत लाईट बाजारात जाऊन पाहणी केली नगर पालिकेचा सफाई ठेकेदाराला बोलावून या भागातील कचरा उचलून स्वच्छता करुन घेतली. तसेच शहरातील इतर भागात ही जाऊन आरोग्य सभापती बढोगे यांनी स्वच्छतेचे पाहणी करुन सूचना दिल्या.

कर्मचार्‍यांना दिल्या सूचना
लाईट बाजार भागात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याची ओरड सोशल मीडियावर दोन दिवसांपासुन सुरु होती. लाईट बाजार भागातील व्यापार्‍यांनी तर घाण व कचर्‍याचे फोटो काढून सोशल मीडियाव व्हायरल केल्यामुळे एकच चर्चा झाली. या विषयी आरोग्य सभापती बढोगे यांनी तातडीने दखल घेत आरोग्य विभागाला फोन करुन या विषयी माहीती दिली. लाईट बाजार भागात जाऊन उभे राहून सफाई कामगारांकडुन सफाई करुन घेतली व रहिवाशांचे समाधान केले. आरोग्य विभागाने शहरात कोणत्या भागात स्वच्छता केली, याचा अहवाल रोज अपडेट ठेवण्याचे सांगत आरोग्य सभापतींनी महत्वाचा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. आरोग्य सभापती झाल्या बरोबर नगरसेवक विश्‍वास बढोगे यांनी वेळोवेळी नगर पालिकेचा आरोग्य विभागाला भेट देऊन शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे.