नवापूरातील सर्व अपूर्ण कामे पूर्ण करणार !

0

शहादा । नवापूर शहरात महिला मंडळासाठी योग्य भवन तयार करणार असून ज्या भागात कामे राहीले आहेत ते आम्ही पूर्ण करू, असे आश्‍वासन कॉग्रेस कमिटेचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी दिले. शहरात बी. डी. एस. समाजातर्फे , नवनियुक्त नगराध्यक्षा हेमलता पाटील, नगरसेवक मंगला सैन, हारुन खाटीक यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाहीः पाटील
यानंतर नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी मला ज्या विश्‍वासाने निवडून दिले. त्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगितले. यानंतर नगरसेवक हारुन खाटीक, नगरसेविका मंगला सैन यांनी पण आभार मानले. यानंतर शंकर दर्जी, धुर्वेश अग्रवाल,राकेश सैन,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड अनिल शर्मा यांनी. केले तर आभार शेैलेश सैन यांनी मानले.

समाज एकजुटीचा विजय
यावेळी मंचावर तुलसीराम शर्मा, मातादिन शर्मा, रुडमल शर्मा, शंकर दर्जी,विजय सैन, राकेश सैन आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत गावीत म्हणाले की, हा विजय समाज एकजुटीचा आहे. समाजासाठी समाजभवन तयार करण्यात येईल. आ.सुरुपसिंग नाईक, माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री माणिकराव गावीत यांचा विश्‍वासाला तडा जाऊ दिला नाही. आपण सर्वानी ताकद लावली म्हणून आपण विरोधकांनवर विजय मिळू शकलो, असे गावित म्हणाले.